ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवाब मलिकांचं सूचक ट्विट, म्हणाले, 'ना डरेंगे, ना झुकेंगे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:36 PM2022-02-23T12:36:04+5:302022-02-23T12:37:13+5:30

Nawab Malik News: ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नबाव मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024! असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Nawab Malik's suggestive tweet while interrogating ED, said, 'Don't be afraid, don't bow down' | ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवाब मलिकांचं सूचक ट्विट, म्हणाले, 'ना डरेंगे, ना झुकेंगे'

ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नवाब मलिकांचं सूचक ट्विट, म्हणाले, 'ना डरेंगे, ना झुकेंगे'

Next

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांची आज सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तर ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नबाव मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024! असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ईडीची चौकशी सुरू असतानाच नवाब मलिक यांनी या ट्विटमधून केंद्र सरकार आणि भाजपाला इशारा दिल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांना आपण घाबरणार नाही, तसेच अशा कारवायांसमोर झुकणार नाही, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार आहोत, असा बोध मलिक यांच्या या ट्विटमधून होत आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने आज मोठी कारवाई केली आहे. आज पहाटे नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे.

या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले. 

Web Title: Nawab Malik's suggestive tweet while interrogating ED, said, 'Don't be afraid, don't bow down'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.