म्याव म्याव विक्रीचा लेडी ड्रग्ज माफियाचा होता डाव; एनसीबीची धडक कारवाई, महिलेसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 08:24 AM2023-06-11T08:24:32+5:302023-06-11T08:26:13+5:30
५० कोटी रुपये मूल्याचे एकूण २० किलो म्याव म्याव तसेच एक कोटी १० लाख रुपयांची रोकड आणि १८६ ग्रॅम सोने असा ऐवज जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ५० कोटी रुपये मूल्याचे मेफोड्रेन किंवा म्याव म्याव या अमली पदार्थांचा सौदा करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिला ड्रग माफियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी तिच्या दोन साथीदारांसह मुंबईच्या डोंगरी भागातून अटक केली आहे.
त्यांच्याकडून अधिकाऱ्यांनी ५० कोटी रुपये मूल्याचे एकूण २० किलो म्याव म्याव तसेच एक कोटी १० लाख रुपयांची रोकड आणि १८६ ग्रॅम सोने असा ऐवज जप्त केला आहे. एनसीबीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. अली नावाच्या व्यक्तीकडे तीन किलो म्याव म्याव आढळून आले; तर त्याचा साथीदार असलेल्या एन. खान याच्या घरी दोन किलो म्याव म्याव मिळाले.
या दोघांच्या चौकशीदरम्यान ए. एफ. शेख या महिलेची माहिती मिळाली. ही महिला गेल्या ७ ते १० वर्षांपासून ड्रग्जचे मोठे रॅकेट चालवत होती. तिच्या घरी छापा मारल्यावर घबाड मिळाले. तिच्याच गँगच्या काही तस्करांना यापूर्वी एनसीबीने अटक केली आहे. कारवाईत एनसीबीने ५० कोटी रुपये मूल्याचे २० किलो म्याव म्याव जप्त केले आहे. ही महिला गेली ७ ते १० वर्षांपासून हे रॅकेट चालवित होती.