NCB vs Nawab Malik: 'त्या' लग्नाच्या फोटोबाबत समीर वानखेडेंचं मोजक्या शब्दात उत्तर; मलिकांच्या आरोपांनी पुन्हा धुमशान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 11:31 AM2021-10-25T11:31:38+5:302021-10-25T12:20:28+5:30
Aryan Khan Arrested in Mumbai Cruise Rave Party Case: समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता.
मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan Khan) याला एनसीबीनं मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप NCB नं केला आहे. या प्रकरणानं सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. NCB अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी आरोपांचा धुरळा उठवला आहे.
समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी मलिकांविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला होता. परंतु आता मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा जुना फोटो शेअर करत पहचान कौन असं म्हणत वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
नवाब मलिकांच्या या नव्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मोजक्याच शब्दात भाष्य करत त्याला उत्तर दिलं आहे. वानखेडे म्हणाले की, २००६ मध्ये माझं लग्न झालं होतं आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं, ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय. माझ्यावर कितीही शिंतोडे उडवायचे ते उडवा. तपास भरकटवण्याचा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाची चिखलफेक सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
'पहचान कौन' असं म्हणत नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर केले आहे. एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते. आज Twitter च्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांनी बनावटपणे नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
संबंधित बातम्या
'समीर दाऊद वानखेडे', नवाब मलिकांनी आणखी एक 'बॉम्ब' फोडला; म्हणाले 'फ्रॉड इथूनच सुरू होतो'
आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचा बॉम्ब फुटला; समीर वानखेडेंना मिळणार होते ८ कोटी? मोठा दावा