एनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 02:44 AM2020-09-29T02:44:37+5:302020-09-29T02:44:51+5:30

डीजी अस्थानांकडून झाडाझडती; बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी तूर्तास सेलिब्रिटींची चौकशी नाही

NCB will now collect evidence against the accused! | एनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार!

एनसीबी आता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करणार!

Next

जमीर काझी ।

मुंबई : अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ईडी आणि सीबीआयच्या तुलनेत ठोस कारवाई करून चर्चेत आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विशेष तपास पथक आता भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर देणार आहे. बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी सध्यातरी कोणत्याही सेलिब्रिटीला अटक किंवा चौकशीसाठी पाचारण केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी रविवारी मुंबईत येऊन विशेष बैठक घेत तपास अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत आतापर्यंतच्या तपासाचा पूर्ण आढावा घेतला. चौकशीसाठी समन्स बजावून प्रसिद्धीपेक्षा संशयिताविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्याला प्राधान्य द्या, पुराव्यांचे पुनरावलोकन करा, अशा शब्दांत त्यांनी कान टोचल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून राष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिलेल्या सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ईडी व सीबीआयच्या हाती आतापर्यंत एकही सबळ पुरावा लागलेला नाही. त्याउलट यातील ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीने मुख्य संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतचा मॅनेजर, नोकरासह आतापर्यंत १९ जणांना अटक झाली. त्यात बहुतांश ड्रग्जपेडलर आहेत.

बैठकीत चौकशी करण्यात आलेल्यांविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्यात आले नसल्याबद्दल अस्थाना यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती, सुशांतचे मॅनेजर, नोकराकडे एकही अमली पदार्थ सापडलेला नाही. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हा मुख्य पुरावा होऊ शकत नाही. अटक केलेल्या तस्करांकडेही किरकोळ प्रमाणातच चरस, गांजा सापडल्याने हे खटले कोर्टात टिकणार नाहीत. त्यासाठी आणखी पुरावे गोळा करा, सबळ पुरावे मिळाल्यानंतरच संशयिताला चौकशीला बोलावून पुढील कारवाई करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

माध्यमांना माहिती पुरविल्याबद्दल ताकीद
च्बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनबद्दल एनसीबीकडे एनडीपीएस कलमान्वये दोन गुन्हे दाखल असून, दोन टीमकडून तपास सुरू आहे. मात्र, एका टीमकडून संबंधिताची माहिती, तपशील, सेलिब्रिटींची नावे आदींची शहानिशा करण्यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे पोहोचवली जात आहे, त्याबद्दल दुसºया टीमच्या अधिकाºयांनी डीजीना पत्र लिहून नाराजी कळविली होती. या प्रकाराबद्दल बैठकीत अस्थाना यांनी अधिकाºयांना खडसावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: NCB will now collect evidence against the accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.