भायखळ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

By admin | Published: October 1, 2014 01:17 AM2014-10-01T01:17:50+5:302014-10-01T01:17:50+5:30

कुलदीप पेडणोकर यांचा निवडणूक अर्ज सोमवारी आयोगाने बाद ठरवल्याने आता कोणाचा प्रचार करायचा, अशा संभ्रमावस्थेत भायखळ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.

NCP activists confused in Bhaykhak | भायखळ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

भायखळ्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात

Next
>मुंबई : भायखळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप पेडणोकर यांचा निवडणूक अर्ज सोमवारी आयोगाने बाद ठरवल्याने आता कोणाचा प्रचार करायचा, अशा संभ्रमावस्थेत भायखळ्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना विचारणा केली असता, वेगवेगळी मते समोर आली. पेडणोकर यांच्या उमेदवारीने सुरुवातीपासून नाराज असलेल्या भुजबळ समर्थकांमध्ये अधिकच नाराजी पसरलेली आहे. विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेला उमेदवार चुकीचा अर्ज भरूच कसा शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या पाच वर्षापासून काँग्रेसचे स्थानिक आमदार मधुकर चव्हाण मदत करीत असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची प्रतिक्रियाही त्या नेत्याने व्यक्त केली.
याउलट एका नेत्याने सुंठीवाचून खोकला गेल्याचे म्हटले आहे. बाहेरील उमेदवार म्हणून पेडणोकर यांच्यावर टीका करताना तो नेता म्हणाला, पेडणोकर यांचा अर्ज बाद ठरल्यामुळे आता अधिकृतपणो मुंबादेवी व शिवडी या शेजारील मतदारसंघांतील राष्ट्रवादीच्या अन्य उमेदवारांचा प्रचार करता येईल.
काँग्रेसच्या गोटात आनंद!
पेडणोकर यांचा अर्ज बाद झाल्याने त्याचा थेट फायदा काँग्रेसचे आमदार चव्हाण यांना होणार आहे. कारण राष्ट्रवादीमुळे होणारे मतांचे विभाजन आता टळणार असून, त्यांचे कार्यकर्तेही काँग्रेसला मिळणार आहेत.
अभासे, मनसेच्या अडचणी वाढल्या?
राष्ट्रवादीचा उमेदवार बाद ठरल्याने काँग्रेसची ताकद द्विगुणित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय नाईक व अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
 
शिवसैनिक 
आदेशाच्या प्रतीक्षेत!
च्भायखळा मतदारसंघात शिवसेनेने अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना अधिकृत पाठिंबा दिला आहे, तरीही मातोश्रीवरून आदेश न आल्याने गीता गवळींच्या प्रचारात शिवसैनिकांनी अजूनही सहभाग घेतलेला नाही. या मतदारसंघातील मराठी मतदारांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून, शिवसैनिकसुद्धा अजूनही संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे.
च्भायखळ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्याने काँग्रेस, मनसे आणि अभासे अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे अभासेच्या गीता गवळी यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून, मराठी मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्नही त्या करीत आहेत. 
च्या मतदारसंघातील मराठी मतदार वर्षानुवर्षे सेनेच्या पाठीशीच उभे राहत असल्याने आता मात्र त्यांच्यासाठी परिस्थिती कठीण आहे. शिवसैनिक मातोश्रीवरून येणा:या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे गीता गवळी काही मूठभर कार्यकत्र्यासोबत प्रचारात दंग झाल्या आहेत.
च्यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्यामुळे अस्वस्थ शिवसैनिक कळीचा मुद्दा ठरणार आहेत. याचा परिणाम निकालावरही दिसून येण्याची शक्यता आहे. 

Web Title: NCP activists confused in Bhaykhak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.