Join us

निकालानंतर 'नॉट रिचेबल' झालेले अजित पवार प्रकटले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 10:08 AM

निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार नॅाट रिचेबल असल्याने पुन्हा नाराज आहेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणुकीत १ लाख ६५ हजार २६५ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळविले. बारामतीत प्रथमच सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा इतिहास यंदा घडला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार नॅाट रिचेबल असल्याने पुन्हा नाराज आहेत की काय अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आपण बारामतीत पवार कुटुंबासोबत वेळ घालवत असल्याची प्रतिक्रिया स्वत: अजित पवारांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, निवडणुकीनंतर बारामतीत कुटुंबासोबत वेळ घालवत होता. तसेच आज पाडव्याच्या निमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या कार्यकत्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाडव्यानिमित्त शरद पवार यांच्यासह अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, नेते येतात. सुमारे ७ ते ८ तास हा शुभेच्छा सोहळा पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी रंगतो. दरवर्षी पवार कुटुंब सार्वजनिक न्यासाच्या वतीने दिवाळीत बारामतीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, या उद्देशाने शारदोत्सवाचे आयोजन केले जाते.

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019