Maharashtra Budget Session: “अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:42 PM2023-03-13T12:42:36+5:302023-03-13T12:44:26+5:30

Maharashtra Budget Session: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

ncp amol mitkari demand for expulsion of abdul sattar and criticized shinde fadnavis govt in maharashtra budget session | Maharashtra Budget Session: “अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी

Maharashtra Budget Session: “अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांचा अपमान केला, कृषिमंत्री पदावरुन हकालपट्टी करा”: अमोल मिटकरी

googlenewsNext

Maharashtra Budget Session: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यात घडणाऱ्या अनेकविध घटनांचे पडसाद विधिमंडळात उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली असून, अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. 

अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे सरकार समर्थन करत आहे आणि शिंदे फडणवीस सरकारने जो शेतकऱ्यांच्या बाबतीत अर्थसंकल्प सादर केला तो फक्त विषाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि एक प्रकारे अब्दुल सत्तारांची पाठ राखण करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे समर्थन केले आहे. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे. या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारांनी माफी मागावी. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषिमंत्री पदावरून अब्दुल सत्तारांची हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली. तसेच प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण झाला आहे, असे सांगत अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले. 

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, प्रचंड नैराश्य आहे 

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय सरकार घेताना दिसत नाही. शेतकऱ्याला कळतेय की, मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तुर उत्पादक शेतकरी, ऊस, हरभरा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पाना पुसण्याचा पाप या सरकारने केले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झालेली असताना थातूरमातूर अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला नाव जरी त्याला पंचामृत दिले असेल मात्र तो प्रत्यक्षात विषयाचा घोट आहे, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी घणाघाती टीका केली. 

दरम्यान, संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राचा आधार घेत, संजय राऊत यांना विनंती करतो की, अनेक घोटाळे बहाद्दर भाजपमध्ये आहेत, त्यांची सुद्धा गुरुकिल्ली काढा. मागच्या सरकारच्या काळात सरकार सत्ता आपली असताना आपण या लोकांना रान मोकळ करून द्यायला नव्हते पाहिजे. ती आपली चूक झाली ही चूक आता तरी दुरुस्त करण्याची वेळ आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp amol mitkari demand for expulsion of abdul sattar and criticized shinde fadnavis govt in maharashtra budget session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.