बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:05 AM2023-07-18T00:05:30+5:302023-07-18T00:06:13+5:30

Amol Mitkari News: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही काय युद्ध केले आहे का, अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली.

ncp amol mitkari reaction after meeting with sharad pawar | बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

googlenewsNext

Amol Mitkari News: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आमदार अजित पवार गटासह सत्तेत सहभागी झाले आहेत. तर काही आमदार शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहेत. अशातच पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री शरद पवार यांच्या भेटीला जात असून, त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

अजित पवार आणि विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार शरद पवारांचा आशिर्वाद घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आलो होतो. रविवारी आमदार मतदारसंघात होते. अधिवेशन सुरु झाल्याने आमदार मुंबईत आहेत. आम्ही माहिती काढल्यावर शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला येणार असल्याचे समजले. म्हणून आम्ही येथे आलो. शरद पवारांना भेटून आम्ही आशिर्वाद घेतला. रविवारप्रमाणे पक्ष एकसंध राहण्याबाबत विनंती केली. शरद पवार यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या मनात आता काय आहे, हे मी सांगू शकत नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. मीडियाशी बोलताना अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत सांगितले. 

शरद पवार ज्येष्ठ नेते, आम्ही काय युद्ध केले आहे का?

प्रफुल्ल पटेल यांनी भेटीवर भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी मंत्र्यांनी तर सोमवारी सर्व आमदारांनी शरद पवारांचा आशिर्वाद घेतला, असे मिटकरींनी सांगितले. यावेळी, शरद पवारांनी आशीर्वाद दिला का? असा प्रश्न अमोल मिटकरींना विचारण्यात आला. यावर, वडिलांकडे गेल्यावर वडील आशिर्वाद देत नसतात का? शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही काय युद्ध केले आहे का?, असा प्रतिप्रश्न मिटकरी यांनी केला. 

दरम्यान, शरद पवारांनी विभागनिहाय पावसाची माहिती घेतली. शेतकऱ्यांची परिस्थिती काय, हे सुद्धा विचारले. त्यामुळे सर्व आमदारांशी शरद पवारांनी शेतीसंदर्भात चर्चा केली. २० मिनिटे बैठक चालली आणि आम्ही परत आलो, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.

 

Web Title: ncp amol mitkari reaction after meeting with sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.