सत्ताकोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:07 AM2019-11-09T03:07:46+5:302019-11-09T03:08:07+5:30

तिसरा पर्याय; २०१४ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

NCP-BJP to support BJP from outside? | सत्ताकोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा?

सत्ताकोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा?

Next

मुंबई : राज्यात निर्माण झालेली सत्ताकोंडी फोडण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देणार का, याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. सरकार स्थापन करण्याचा दावा न करता फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात सत्तापेचातील गुंता अधिकच वाढला आहे. राजीनामा देऊन आल्यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप केले.

फडणवीस यांचे वक्तव्य पाहता युतीत आता चांगलेच बिनसले असून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. शिवसेना इतर पर्यायांची चाचपणी करत असताना पुन्हा भाजपच सरकार स्थापन करेल, असा दावा काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. हा दावा त्यांनी कशाच्या आधारे केला? एकतर शिवसेनेला पुन्हा सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागेल. पण सध्याच्या परिस्थितीत ही शक्यता धुसर दिसते. दुसरा पर्याय म्हणजे, राष्टÑवादी काँग्रेसने २०१४ प्रमाणे फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा देणे किंवा विश्वासमताच्या वेळी सभागृहात गैरहजर राहून भाजपला मदत करणे.

आघाडीतून बाहेर पडावे लागेल
निवडणूक काळात भाजप नेत्यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर केलेले आरोप आणि ईडीचे शुक्लकाष्ठ पाहाता राष्टÑवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती, निवडणूक टाळणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक आदी मुद्दे पुढे करून शरद पवार पाठिंब्यासाठी पुढे येतील, असे राजकीय जाणकारांना वाटते.
यदाकदाचित राष्टÑवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला, तर राज्यात महाआघाडीतून आणि राष्टÑीय पातळीवर संपुआतून त्यांना बाहेर पडावे लागेल.

Web Title: NCP-BJP to support BJP from outside?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.