हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 15:39 IST2020-02-18T15:29:13+5:302020-02-18T15:39:42+5:30
शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

हिंमत असेल तर पुन्हा लोकसभा निवडणूक घ्या, शरद पवारांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान
मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान राज्यातील महाविकास आघाडीला दिले होते. यावर राज्याची विधानसभा निवडणूक कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या, असे प्रतिआव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.
सध्या राज्यात एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच, एल्गार परिषद प्रकरणात अनेकांना विनाकारण गोवण्यात आले आहे. त्याठिकाणी उपस्थित नसलेल्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
याशिवाय, मागच्या सरकारने त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला. यात त्यांना काही पोलिसांनीदेखील साथ दिली. त्यामुळे या प्रकरणात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी व्हायलाच हवी. तसा अधिकार राज्य सरकारला आहे. एल्गार प्रकरणात मागच्या सरकारने जे केले, ते लोकांसमोर यायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, ‘हिंमत असेल तर, आमचे सरकार पाडून दाखवा’ असे खुले आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले होते. याला दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिले होते. त्यावेळी ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
एल्गार प्रकरणात मागच्या सरकारनं जे केलं, ते लोकांसमोर यायला हवं- शरद पवार
शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान
मेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरू
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश
China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?