'आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय...'; कोश्यारींच्या पत्रावर शरद पवारांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 10:34 AM2023-01-28T10:34:50+5:302023-01-28T10:40:51+5:30

येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 

NCP chief Sharad Pawar has said that it is a good thing that Maharashtra is getting rid of the governor | 'आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय...'; कोश्यारींच्या पत्रावर शरद पवारांचं विधान

'आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय...'; कोश्यारींच्या पत्रावर शरद पवारांचं विधान

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्यानंतर आता नवीन राज्यपाल कोण येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणूक दीड-दोन वर्षांवर असताना भाजपा परिवारातील व्यक्तीची आणि त्यातही महाराष्ट्राची माहिती असलेल्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून संधी दिली जाऊ शकते. राज्यात कोण येणार? याची चर्चा आता रंगली आहे.मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यामध्ये कोण राज्यपाल येणार हे माहित नाही. मात्र, आत्ताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ही चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार म्हणाले.

राजस्थान भाजपमधील वजनदार नेते ओम माथुर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, राज्यसभा सदस्य राहिलेले मध्य प्रदेशातील भाजपचे नेते प्रभात झा, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची राज्यात राज्यपालपदासाठी नावे चर्चेत आहेत. माथूर हे २०१४च्या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राहिले आहेत. राज्यातील भाजपच्या नेत्यांशी त्यांचे स्रेहपूर्ण संबंध आहेत. सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील असल्या तरी मराठी आहेत आणि त्यांचे माहेर मुंबई आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले अमरिंदरसिंग हे भाजपचे पंजाबमधील नेते आहेत.

दरम्यान, पहाटेचा शपथविधी ही खेळी असू शकते. त्यामुळे राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यास मदत झाली असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. जयंत पाटील यांच्या या विधानावर आता स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्ष होऊन गेले आहेत. त्यामुळे आता तो प्रश्न कशाला काढायचा, असं शरद पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. 

वंचितसोबत कोणतीही चर्चा नाही- 

शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. आम्ही आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read in English

Web Title: NCP chief Sharad Pawar has said that it is a good thing that Maharashtra is getting rid of the governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.