Join us  

Sharad Pawar On Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गृहमंत्री फडणवीसांनी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:24 PM

Sharad Pawar On Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.

Sharad Pawar On Shraddha Murder Case: संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी दररोज एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. यावरून आता राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रथमच भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. 

हे प्रकरण मला जास्त माहिती नाही. हा विषय खूप गंभीर आहे. त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. आमच्या पक्षाची एक बैठक होत आहे. या बैठकीत वाढती महागाई, राज्यात आणि देशात महिलांवर वाढते अत्याचार यावर आम्ही चर्चा करणार आहोत. त्यावर काही कार्यक्रम ठरवण्याविषयी आणि या मुद्द्यांवर धोरण ठरवण्यासाठी आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार आहोत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. 

राज्याचे गृहखाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे

उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीश्रद्धा वालकरने मविआ सरकारच्या काळात लिहिलेल्या पत्रावर कारवाई झाली असती, तर श्रद्धा वालकरचा जीव वाचला असता, असे वक्तव्य म्हटले होते. यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्याचे गृहखातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे फडणवीसांनी मागे काय झाले त्यावर बोलण्याऐवजी आजच्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाने लिहिलेले पत्र गंभीर असल्याचे म्हटले आहे. श्रद्धाने लिहिलेले पत्र वाचले. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. कोणावरही आरोप करत नाही. मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तीचा जीव वाचला असता, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :श्रद्धा वालकरशरद पवारदेवेंद्र फडणवीस