"सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बरळत आहेत, सत्ता गेल्यानंतर सुचेनासे झाले" 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:20 PM2022-03-29T15:20:59+5:302022-03-29T15:23:24+5:30

NCP Clyde Crasto Slams Sadabhau Khot : क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

NCP Clyde Crasto Slams Sadabhau Khot Over Sharad Pawar Statement | "सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बरळत आहेत, सत्ता गेल्यानंतर सुचेनासे झाले" 

"सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते बरळत आहेत, सत्ता गेल्यानंतर सुचेनासे झाले" 

Next

मुंबई - सत्तेपासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोतांचे (Sadabhau Khot) मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते बरळू लागले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

"सदाभाऊ खोतांचे 'उपाशी खोत' असंच नामकरण करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे" असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

"आदरणीय शरद पवारसाहेब महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानेच सदाभाऊ खोत पवारसाहेबांवर बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत मात्र त्यांची पवारसाहेबांवर बोलण्याइतपत लायकी नाही हे पहिले लक्षात ठेवावे" असा स्पष्ट इशाराही क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे महान नेते आहेत. मात्र त्यांनी राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे कांही केलं नाही, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे. शरद पवारांनी जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' करावं, असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
 

Web Title: NCP Clyde Crasto Slams Sadabhau Khot Over Sharad Pawar Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.