मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना उपमुख्यमंत्री बनवणे म्हणजे...; NCP चा फडणवीसांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 04:10 PM2023-06-12T16:10:07+5:302023-06-12T16:10:50+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पलटवार केला आहे.

NCP has responded to the criticism made by Devendra Fadnavis | मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना उपमुख्यमंत्री बनवणे म्हणजे...; NCP चा फडणवीसांना खोचक टोला

मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना उपमुख्यमंत्री बनवणे म्हणजे...; NCP चा फडणवीसांना खोचक टोला

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. राष्ट्रवादीत भाकरी फिरवली पाहिजे असं विधान पवारांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यानंतर शरद पवारांनी स्वत: अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली होती. आता पवारांनी पक्षाचे कार्याध्यक्षपद २ जणांकडे सोपवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. त्यावर राष्ट्रवादी प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पलटवार केला आहे. 

राष्ट्रवादी प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, "भाकरी फिरवणे नव्हे तर धूळफेक" असं फडणवीस म्हणतात, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना उपमुख्यमंत्री बनवणे म्हणजे, "भाकरी फिरवणे आणि इच्छांवर धूळ फेकणे असं असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत बदलावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'शरद पवारांनी भाकरी फिरवली, असे म्हणतात. पण, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरविणे नाही, तर ही धुळफेक करणे म्हणतात. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे', असं त्यांनी म्हटलं. 

‘माझे रिपोर्टिंग अजितदादांकडेच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाल्यानंतर अजित पवार नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. त्याला सुळे यांनी चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे. ‘अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचे पद हे मुख्यमंत्री समान असते. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्याध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे’, असे सुळे यांनी ठणकावून सांगितले.
 

Web Title: NCP has responded to the criticism made by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.