Join us

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस? नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याने चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 2:02 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला.

मुंबई- राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणकीत नाशिक मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला, काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवला, यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली तर तांबे यांना सल्लाही दिला. 

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. 'राष्ट्रवादीने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीनेही मदत केल्याचा मोठा खुलासा केला आहे, अजित पवार एक जबाबदार व्यक्ती आहेत. तेच असं बोलत असतील तर महाविकास आघाडीची बैठक असेल तेव्हा आम्ही यावर खुलासा करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटाले यांनी दिली.     

एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

नाना पटोले यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, दै.लोकमतच्या मुलाखतीत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केले आहेत.  तसेच सत्यजीत तांबे यांना सल्लाही दिला. ''सत्यजीत यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे. त्यांना बरीच वर्षे राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्यामुळे सत्यजीतने या सगळ्याचा विचार करुन निर्णय घ्यावा हे माझं मत आहे. सत्यजीतने ऐकावं नाही ऐकावं हा त्यांचा निर्णय आहे.  पण, त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारांशी निगडीत असल्याने आणि काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या सेलचे प्रमुख अनेक वर्षे तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मधल्या दीड महिन्याच्या काळात काय झालं ते त्यांनी मनाला जास्त लावून घेऊ नये आणि त्यांनी काँग्रेससोबत राहावं, असंही अजत पवार म्हणाले.

29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय

सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. 

टॅग्स :नाना पटोलेअजित पवारसत्यजित तांबेकाँग्रेस