Join us

"राष्ट्रवादी सत्तेविना तळमत आहे; पण पुढचे १५ वर्षे त्यांना सत्तेविनाच राहावे लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:07 AM

आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई - राज्याच्या राजकारणात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यामुळे सत्तांतर झाले. सत्तेतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पायउतार व्हाव लागले. एकीकडे देशात भाजपचे स्थीर सरकार असताना महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. त्यामुळे, भाजपकडूनही सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाले. त्यातूनच शिवसेनेतील बंडखोर गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं. मात्र, यावरुनच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी युती सरकावर टीका केली. त्यास, आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात सुरु असलेलं राजकारण हे लोकशाहीला घातक आहे. यातून लोकशाही टिकणार नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पर्याय म्हणून समोर आलं पाहिजे. तरच लोकशाही टिकेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निबांळकर यांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. याला राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, राष्ट्रवादी सत्तेविना तळमळत असून पुढील १५ वर्षे त्यांना सत्तेविनात राहवं लागणार असल्याची टीका देसाई यांनी केली आहे. 

“राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली, असे शंभुराज देसाईंनी म्हटले. तसेच, “बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार आहे,” असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसरामराजे नाईक-निंबाळकरशंभूराज देसाईएकनाथ शिंदे