Join us  

राष्ट्रवादी ही एक सर्कस अन् जितेंद आव्हाड त्यातील जोकर; मनसेचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:36 PM

मुंब्र्यात आतापर्यंत सापडलेल्या अतिरेक्यांची कुंडलीच वाचून दाखवली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आतातरी राजकारण सोडणार का? असा सवाल मनसेने केला आहे.

नवी मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला. राज यांच्या सभेनंतर राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आव्हाडांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता मनसेचे नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. राष्ट्रवादी ही एक सर्कस असून जितेंद्र आव्हाड त्यातील जोकर आहेत असा टोला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला आहे.

गजानन काळे म्हणाले की, राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मुंब्र्यात वस्तरा जरी सापडला तर मी राजकारण सोडेन असे वक्तव्य केले होते. त्याला प्रति उत्तर म्हणून राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मुंब्र्यात आतापर्यंत सापडलेल्या अतिरेक्यांची कुंडलीच वाचून दाखवली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आतातरी राजकारण सोडणार का? असा सवाल करत राष्ट्रवादी ही एक सर्कस असून जितेंद्र आव्हाड हे या सर्कसमधील एक जोकर असल्याची खोचक टीका मनसेने केली आहे.

आम्ही अजून २६/११ देखील विसरलो नाही

तर मुंब्रामध्ये आतापर्यंत दोन ते तीन घटना झाल्याचे आव्हाड म्हणाले, मात्र या दोन ते तीन घटनांमध्ये किती लोक मेले हे आव्हाडांना माहित नाही का? आणि फक्त दोन ते तीन म्हणजे आणखी किती घटना व्हायला पाहिजे, असे आव्हाड यांना वाटतय. आम्ही अजून २६/११ देखील विसरलो नाही अशी टीका मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. आमच्या नेत्याचा चेहरा कोंबडीच्या कुठल्या भागात सारखा दिसतो, मग आम्ही जर म्हणालो की त्यांच्या नेत्यांचा चेहरा म्हशीचा कोणत्या भागात सारखा दिसतो? तर हे काय बोलणार, पण आम्ही असे बोलत नाही कारण आमच्या संस्कृतीत ते बसत नाहीत असंही अविनाश जाधव म्हणाले.

तसेच जर राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल व्हायलाच हवा, तलवार दाखवणे ही एक प्रकारची संस्कृती आहे, त्यामुळे जर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, राज साहेबांचा आदेश काहीही झालं तरी पाळला जाणार, जर ते म्हणाले की भोंगे उतरणार नाही आणि डेसिबलची मर्यादा पाळत तर आम्ही देखील त्यांच्या समोर भोंगे लावणार आणि डेसिबलच्या मर्यादेत भोंगे वाजवणार असंही मनसेने सांगितले आहे.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडमनसे