Join us  

'अजित पवार आजकाल फार शांत, चिंता वाटतेय'; भास्कर जाधवांना नेमकं काय सूचवायचंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 5:56 PM

अजित पवार यांचं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही कौतुक केलं.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सभागृहातील सदस्यांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवारांचं कौतुक केलं. 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातत्याने बारामतीचे आमदार म्हणून काम केले. त्यांनी बारामतीचे विकास मॉडेल विकसीत केले आहे. अजित पवार यांनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अजित पवार यांच्यासमोर अनेक दिग्गज नेते होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वमान्य नेतृत्व होण्याची किमया केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काहीही कमी पडू देणार नाही; नरेंद्र मोदींसोबतची 'फोन पे चर्चा' एकनाथ शिंदेंनी सांगितली!

अजित पवार यांचं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही कौतुक केलं. अजित पवारांची कार्यपद्दती, निर्णयक्षमता याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांना स्वच्छता खूप आवडते हादेखील त्यांच्यातील एक गुण आहे. वक्तशीरपणा, प्रशासन हाताळण्यात कसोटी, स्पष्ट बोलण्याचा याबाबत स्वच्छता फार आवडते हेदेखील खरं आहे असं भास्कर जाधव म्हणाले. 

विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही कणखरपणे भूमिका घ्या, असं आवाहन देखील भास्कर जाधव यांनी यावेळी केलं. तसेच अजित पवार आजकाल फार शांत आणि सामंजस्याची भूमिका घेत आहेत याची चिंता वाटते. पुण्यातील देहू येथे कार्यक्रमात तुम्हाला बोलू दिलं नाही, पण त्यावर काही बोललात नाही. त्यावेळी तुम्ही संतापात खाली उतराल, असं वाटलं होतं, असा मिश्किल टोला देखील भास्कर जाधव यांनी लगावला. 

'माझं तुमच्यावर प्रेम होतं'; बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे भेटताच आदित्य ठाकरे झाले भावूक

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपा, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. आहेत का हो आव्हाड साहेब, अशा शब्दांच शिंदे यांनी राष्ट्रवादीला कोपरखळी मारली. नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाही ना, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाला लगावला. 

टॅग्स :अजित पवारभास्कर जाधवशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस