दिल्लीचा तख्त आग लागून जळून खाक होईल; अमोल मिटकरी यांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:31 PM2022-03-26T13:31:28+5:302022-03-26T14:33:49+5:30

किरीट सोमय्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. 

NCP leader Amol Mitkari has criticized BJP leader Kirit Somaiya | दिल्लीचा तख्त आग लागून जळून खाक होईल; अमोल मिटकरी यांचा भाजपावर घणाघात

दिल्लीचा तख्त आग लागून जळून खाक होईल; अमोल मिटकरी यांचा भाजपावर घणाघात

Next

मुंबई- भाजपाचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूर गेले तिथेही राडा झाला. नंतर पुण्याला गेले तिथेही राडा झाला. त्यानंतर रायगडला गेले आणि तिथेही वाद निर्माण झाला आणि आता आज किरीट सोमय्या निघाले आहेत रत्नागिरीतल्या दापोली दौऱ्यावर आणि हा दौऱ्यातही वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोकणातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, किरीट सोमय्या आज सकाळीच दापोली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. 

दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक मोठा हातोडा प्रसारमाध्यांसमोर दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. मात्र किरीट सोमय्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. 

सर्व केंद्रीय यंत्रणा कळसूत्री आहे. किरीट सोमय्यांना याची किंमत चुकवावी लागेल. सोमय्यांचा हातोडा भाजपाच्या टाळक्यांवर पडणार, असं मिटकरी यांनी सांगितलं. तसेच दिल्लीचा तख्त आग लागून जळून खाक होईल, असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे. 

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी आज चलो दापोलीचा नारा दिला आहे. मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असेही ते म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दोपीलाला जात आहे, असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं. 

किरीट सोमय्यांनी दापोलीला येऊन दाखवावं- राष्ट्रवादीचे नेते  संजय कदम 

किरीट सोमय्यांनी दापोलीला येऊन दाखवावं. आम्ही त्यांना रोखणार'. हे गुजरात नाही तर कोकण आहे. आम्ही कोकणातील लोक, पर्यटकांच्या साथीनं त्यांना रोखणार. यांच्या राजकारणाचा मोठा फटका आमच्याकडील पर्यटनाला बसत आहे. स्थानिकांनी कर्ज काढत, कोरोनातून सावरत आपला घसरलेला गाडा रूळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे दापोली, मंडणगडमधील नेते संजय कदम यांनी केली आहे.

Web Title: NCP leader Amol Mitkari has criticized BJP leader Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.