बापाची चप्पल आली की बापाची अक्कल येत नाही; आनंद परांजपेंचा खासदार श्रीकांत शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:04 AM2022-01-17T10:04:29+5:302022-01-17T10:06:05+5:30

वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली होती.

ncp leader Anand Paranjape slams shiv sena MP Shrikant Shinde | बापाची चप्पल आली की बापाची अक्कल येत नाही; आनंद परांजपेंचा खासदार श्रीकांत शिंदेंना टोला

बापाची चप्पल आली की बापाची अक्कल येत नाही; आनंद परांजपेंचा खासदार श्रीकांत शिंदेंना टोला

googlenewsNext

मुंबई : बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना रविवारी पत्रकार परिषदेत लगावला. 

वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली होती. त्याला ते प्रत्युत्तर देत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्र्याचे आदेश धुडकावत वैयक्तिक टीका केली. आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल. मात्र कळव्यातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा पुनरुच्चार परांजपे यांनी केला. खासदार शिंदे यांनी त्याचे श्रेय घ्यावे; पण गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादीवर हल्ला केला, तर उत्तर देणार असे त्यांनी स्पष्ट केले.

मग दिवा उड्डाणपूल कधी?
उड्डाणपुलाच्या पाठपुराव्याबरोबर मतदारसंघात विकासकामे झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. ती यापूर्वीही होत होती. जर विकास झाला असेल, तर कल्याण टर्मिनस, शीळफाटा, मानकोली-मोठा गाव पूल, दिवा उड्डाणपूल कधी होणार, याचे वेळापत्रकही खासदारांनी द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

वादात भाजपची उडी
खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात जितेंद्र आव्हाड यांनी ‘काम करे बंदर और मार खाये मदारी,’ असे वक्तव्य केले. यावर भाजपचे संदीप लेले यांनी ते बंदर कोणाला म्हणाले? हे आम्हाला चांगलेच समजते. पण मार खाये मदारी म्हणजे नेमके कोण? हे आव्हाड यांनी सांगावे, असा खोचक प्रश्न करत या वादात उडी घेतली. 

Web Title: ncp leader Anand Paranjape slams shiv sena MP Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.