मुंबई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे. ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळ यांच्यासहीत 35 आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, नव्या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार की नाही? यावर 6 सप्टेंबरला निर्णय होणार आहे.
दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी छगन भुजबळ यांची चौकशी सुरू झाल्यावर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. हे छापासत्र सुरू झाल्यावर भुजबळांची संपत्ती आणि मालमत्ता यांची माहिती समोर येऊ लागली. भुजबळांच्या संपत्तीचा आकडा अनेकांचे डोळे विस्फारुन टाकणारा होता. याशिवाय मोक्याच्या जागेवरील मालमत्ता, महागड्या गाड्या, मोठमोठाले फ्लॅट्स यांचा आकडादेखील आश्चर्यजनक आहे.
मुंबईनिवासस्थान मालक मालमत्तासुखदा को.ऑ.हौ.सो. वरळी छगन भुजबळ २००० चौ.फुटांचे घर, टोयोटा कॅमरी कारमिलेशिया अपार्टमेंट, माझगाव छगन भुजबळ ६०० चौ.फुटांची तीन घरेमाणेक महल, ५वा मजला पंकज भुजबळ १२०० चौ. फुटांचे घरमाणेक महल, ७वा मजला मिना छ. भुजबळ १२०० फुटांचे घर (भाड्याने दिलेले)सागर मंदिर को.ऑ.हौ.सो., हिराबाई मगन भुजबळ ६०० चौ. शिवाजी पार्क फुटांचे घरसाईकुंज बिल्डिंग, दादर (पू.) विशाखा भुजबळ १५०० चौ. फु. घर, शेफाली भुजबळ (१२०० चौ. फू.), हिराबाई भुजबळ (१५०० चौ.फू.), मिना भुजबळ (१२०० चौ.फू.),ग्रोथ इन्फ्रा, दुकान (१५०० चौ.फू.)सॉलिटेअर बिल्डिंग, समीर भुजबळ संपूर्ण पाचवा माळा, एस.व्ही. रोड, सांताक्रूझ २५०० चौ.फू.घरपंकज भुजबळ सातवा माळा, २५०० चौ.फू. घरमिना भुजबळ आठवा मजला २५०० चौ.फू. घर
ठाणेपी एच ७, मारुती पंकज भुजबळ १३५० चौ.फू. घर, एनक्लेव्ह को. ऑ. सो. तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीचे एक घरमारुती पॅराडाइज को.ऑ.हौ. दुर्गा भुजबळ १३०५ चौ.फू.घरसो.बी-विंग. सीबीडी बेलापूरमारुती पॅराडाइज को.ऑ. हौ. भुजबळ ग्रुप एकूण नऊ गाळे, सी-विंग. सीबीडी बेलापूर त्यातील दोन भाड्याने तर सात बंद.एव्हरेस्ट को.ऑ.हौ. पंकज भुजबळ १३०० चौ.फू.घरसोसायटी सीबीडी बेलापूरलाजवंती बंगला, मिना भुजबळ १३०० चौ.फू. घरसीबीडी बेलापूर
नाशिक चंद्राई बंगला, भुजबळ फार्म मिना भुजबळ ४००० चौ.फू. बंगलाभुजबळ पॅलेस, भुजबळ पंकज भुजबळ ४६५०० चौ.फू. बंगला. किंमत अंदाजे १०० कोटी. २५ खोल्या, स्विमिंग पूल व जीम.येवला पंकज भुजबळ ५००० चौ.फू. ११ खोल्यानमाड येथे बंगला, ऑफिस ३००० चौ.फू., पाच खोल्याराम बंगला समीर भुजबळ १५०० चौ.फू.
पुणेलोणावळा, मु.पो. आवतन पंकज भुजबळ, २.८२ हेक्टरजागेत समीर भुजबळ सहा बेडरूमचा अलिशान बंगला, परदेशी फर्निचर, प्राचीन मूर्ती, स्विमिंग पूल, हेलिपॅड, शेततळे, तीन नोकरांची घरे, सुरक्षा रक्षकांकरिता पाच खोल्या, अंदाजे पाच कोटी किमतींची फळझाडांची लागवड.ग्राफीकॉन आर्केड, समीर भुजबळ घरसंगमवाडी फ्लॅट नं. २०८,तिसरा माळा, प्लॉट नं. १५३,
नेमके काय आहे प्रकरण?
छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी १७ जून, २०१५ रोजी मनी लाँडरिंगचे दोन गुन्हे दाखल केले होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार, कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आरोपपत्रात भुजबळ यांच्यासह पंकज, समीर आणि अन्य १४ जणांची नावे होती. महाराष्ट्र सदन बांधण्याचे कंत्राट मेसर्स चमणकर डेव्हलपर्स यांना देण्यात आले होते. अंधेरीतील आरटीओ कार्यालय इमारत, मलबार येथील सरकारी अतिथीगृहाच्या बांधकामाचे कंत्राट देताना, नियम धाब्यावर बसविण्यात आले व त्यात भुजबळ कुटुंबाला मोठी लाच देण्यात आल्याचा ‘ईडी’नं आरोप केला होता. भुजबळ हे उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा हा आर्थिक घोटाळा झाल्याचे 'ईडी'चे म्हणणं आहे.भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सरकारी तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही ‘ईडी’चे सांगितले होते. भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास करणाऱ्या ‘ईडी’ला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी म्हणजे भुजबळ कुटुंबाला मिळालेली लाच आहे. कंत्राटदारांना प्रकल्पाचे काम देण्याच्या बदल्यात भुजबळ कुटुंबाला रोख रक्कम मिळाली असून, ती रक्कम विविध कंपन्या व व्यवसायात गुंतविण्यात आली असल्याचे 'ईडी'ने सांगितले होते.