Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:36 PM2022-04-12T23:36:25+5:302022-04-12T23:37:50+5:30

Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

ncp leader dhananjay munde admitted to breach candy hospital in mumbai after suffered a minor heart attack | Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

Dhananjay Munde Heart Attack: धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालायात गेले होते. टोपे यांनी धनंजय मुंडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.

राजेश टोपेंनी दिली धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती

धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या. डॉ. समधानी हे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी काही रिपोर्ट काढले असून, ते नॉर्मल आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. धनंजय मुंडे परभणीत होते. त्यानंतर त्यांचा जनता दरबार होता. धावपळ झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना त्रास झाला असावा. तसेच बुधवारी पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेणार आहे. डॉक्टरांनी बोलावले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. नॉर्मल राहा. चिंता करू नका. जास्त ताण न घेण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. 

Web Title: ncp leader dhananjay munde admitted to breach candy hospital in mumbai after suffered a minor heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.