'कसं काय शेलार बरं हाय का? कमळाबाईचे काही खरं हाय का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 04:10 PM2019-04-10T16:10:26+5:302019-04-10T16:11:26+5:30
राजकीय मैदानात धनंजय मुंडे आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. तेच धनंजय मुंडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर अचूक नेम धरतात.
मुंबई - राज्याचे विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे हे सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असतात. राजकीय मैदानात धनंजय मुंडे आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. तेच धनंजय मुंडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर अचूक नेम धरतात.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य करत ट्विटवरवरुन भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. सत्तेसाठी आमच्या पक्षातील नेते फोडले यावरुन धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांवरुन धनंजय मुंडे यांनी भाजपाला टार्गेट केलं आहे. काही दिवसांपूर्वी बीडमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. तसेच माढा मतदारसंघातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
यावरुन धनंजय मुंडे यांनी भाजपाला आमच्या पक्षातील विझलेले दिवे घेऊन तुमच्या घरात उजेड पडेल काय असा टोला लगावला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे ट्विटमधून -
कसं काय शेलार बरं हाय का?
कमळाबाईचे काही खरं हाय का?
काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली
वागणं तुमचं हाय रं गैर
आता तुमची नाय रं खैर
नेहमीच तुम्ही
खेळतात कावे
काय हाय उपयोग
घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा
उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?
कसं काय शेलार बरं हाय का?
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 10, 2019
कमळाबाईचे काही खरं हाय का?
काल म्हणे तुमची हद्दच झाली
सत्तेसाठी आमची पक्षफोडी केली
वागणं तुमचं हाय रं गैर
आता तुमची नाय रं खैर
नेहमीच तुम्ही
खेळतात कावे
काय हाय उपयोग
घेऊन विझलेले दिवे?
तुमच्या घरात त्याचा
उजेड पडल काय?
कमळाबाईचे काही खरं हाय का?
धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल्याचं हे पहिलचं उदाहरण नाही. याआधीही आशिष शेलार यांनी मनसे-राष्ट्रवादी यांना टार्गेट करत शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीचे बोरं असं ट्विट करत टीका केली होती. आशिष शेलार यांच्या ट्विटला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत उत्तर दिलं होतं. “काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना, मंत्रिपद दिलं जायना, शिवसेनेविरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले, प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी आठवले” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांना चिमटा काढला आहे.
शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे, शेलारांचा मनसे-राष्ट्रवादीला टोला