हे राज्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की बिहार निवडणूक प्रभारी?; जयंत पाटील यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:18 PM2020-09-09T21:18:02+5:302020-09-09T21:19:10+5:30

ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

NCP leader Jayant Patil ask question to Ex Cm Devendra Fadanvis | हे राज्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की बिहार निवडणूक प्रभारी?; जयंत पाटील यांचा खोचक सवाल

हे राज्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की बिहार निवडणूक प्रभारी?; जयंत पाटील यांचा खोचक सवाल

googlenewsNext

शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महानगर पालिकेनं कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयावर (  Kangana Ranaut's office) कारवाई केली. पण, मुंबई उच्च न्यायलयानं या कारवाईला स्थगिती देण्यात आली. मुंबई महानगर पालिकेच्या या कारवाईनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी, ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात ते हिंदीत बोलताना दिसत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनी खोचक सवाल केला.

Kangana Ranaut : ...कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video 




काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की,''छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतकं घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. आपल्या विचारांचा विरोध करणारे, व्यक्ती असतील, पत्रकार असतील या सर्वांना दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून अवैधपणे होत आहे. ज्या प्रकारे एखाद्या वक्तव्याचा महाराष्ट्राचा किंवा मुंबई पेलिसांचा अवमान होतो, त्याचं समर्थन करता येत नाही. पण, सरकारच्या अशा कृतीचंही समर्थन करता येत नाही. या कृतीमुळे उभ्या देशात महाराष्ट्राची बदनामी होतेय.''

ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

''काल-परवापर्यंत ते बांधकाम तिथे होतं, तेव्हा कारवाई केली जात नाही. पण, अचानक कुणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते. मग अन्य अवैध बांधकामावर सरकार का कारवाई करत नाही? केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. राज्य सरकारला शोभणारी नाही. महाराष्ट्रात एकप्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे,''असेही ते म्हणाले. 

कंगना राणौत घाबरणारी नाही, उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल; बबिता फोगाट, Video

आज पुन्हा राम मंदिर उद्ध्वस्त होतंय - कंगना
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली आहे. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: NCP leader Jayant Patil ask question to Ex Cm Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.