मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे वादग्रस्त विधान बुधवारी केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे. गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात येत आहे.
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा पक्षाच्याच काही मोठ्या नेत्यांनी त्यांना झापलं असं आम्हाला समजलं. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून काही गोष्टी शिकून घ्याव्यात, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे काही लोकं चर्चेत येण्यासाठी काहीही बोलून जातात. मात्र काय आपण बोललो हे विसरुन जातात, असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
तत्पूर्वी, गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील, असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले.
विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील शरद पवारांवरील वादग्रस्त विधानावर गोपीचंद पडळकरांची शाळा घेतली आहे. गोपीनाथ पडकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाचं अधिकृत विधान नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा शरद पवार असो, अशा पद्धतीने टीका करणं चुकीचं आहे, असं प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले.
भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान
गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-
शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा
"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला
मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी
CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...