मुंबई :मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. आता भाजपने पत्राचाळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत, पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.
आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकर दिले. 'काल माझ्यावर काही आरोप झाले आहेत का, त्या बैठकीत पत्राचाळ प्रकरणी काम देण्यात आले या विधानाला काही आधार आहे का असा सवाल पवार यांनी यावेळी केला.
यानंतर माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात माहिती दिली. ही बैठक २००६ साली आहे. हा प्रकल्प १९८८ चा आहे. तेव्हापासून प्रकल्प अडकला आहे, यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करा पण पराचा कावळा करु नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
एखाद्या प्रकरणाचा पराचा कावळा करायचा आणि लोकांचे दिशाभूल करायचं. सगळे कागदपत्र सरकारला द्या, सरकार निर्णय घेईल. हे सगळ करुन शरद पवार यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही कधीच बेछूट आरोप करत नाही. तुम्ही लगेच या प्रकरणाची चौकशी करा, असंही आमदार आव्हाड म्हणाले.
Maharashtra Politics: “शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर, उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी”
'या प्रकरणात आरोप काय आहेत. चौकशी करणारी एजन्सी कोर्टात काय म्हणत आहेत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतील, पत्राचाळ प्रकरणी चौकशीला आम्ही तयार आहे. लवकरात लवकर चौकशी करा, जर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणाऱ्यांवर काय भूमिका घेणार हेही राज्य सरकारने जाहीर करावे, असंही खासदार शरद पवार म्हणाले.