"देवेंद्रजी, मुंबई मेट्रो -३ मध्ये तुम्हाला फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळणार"; राष्ट्रवादीचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 02:32 PM2021-01-28T14:32:41+5:302021-01-28T14:37:08+5:30
फोटो ट्वीट करत मुंबई मेट्रो ३ मधून विमानतळापर्यंत असा प्रवास कधी करायला मिळेल असा फडणवीस यांनी केला होता सवाल
बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले होते. "मी मेट्रो-३ या मार्गाने विमातळापर्यंत असा प्रवास कधी करू शकेन," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला होता. दरम्यान यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना टोला लगावला आहे.
"मुंबई मेट्रो - ३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांची अपेक्षा आहे." असा टोला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
काल माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो ट्विट करत मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल अशी विचारणा केली. त्यांना माझे विनम्रपणे हे सांगणे आहे की मुंबई मेट्रोचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत मविआ सरकार गांभीर्याने लक्ष देत कटिबद्ध आहे. pic.twitter.com/VWH7jA7oOj
— Mahesh Tapase महेश तपासे (@maheshtapase) January 28, 2021
I travelled in Delhi Metro today to return back to the airport & reached in a very short span as compared to travel by road!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 27, 2021
Don’t know when will I be able to travel in Mumbai Metro 3 to the airport, looking at the things messed up by MVA on CarShed issues #Metro#Mumbaipic.twitter.com/JKPTElbcdD
"महाविकास आघाडी सरकार मुंबई मेट्रो - ३ लवकरच सुरू करेल आणि ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्धही आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण समन्वय केलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल असंही तपासे म्हणाले.