"ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय"; हसन मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:39 PM2023-03-11T17:39:42+5:302023-03-11T17:40:01+5:30

हसन मुश्रीफांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे.

NCP leader Supriya Sule has reacted to the action against Hasan Mushrif. | "ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय"; हसन मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

"ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय"; हसन मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. कागल येथील मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली आहे. दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी सकाळी आठच्या सुमारास इडीचे पथक मोठ्या फौजफाटा घेऊन दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कारवाईची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गैबी चौक आणि मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर जमले असुन तणावाची परीस्थिती तयार झाली आहे. सध्या आमदार मुश्रीफ हे निवासस्थानी नाहीत. जवळपास डझनभर वाहनातून दहा ते बारा अधिकारी आणि ३०-३५ CRPF जवान आले आहेत. ही राजकीय कारवाई असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते भय्या माने यांनी केला आहे.

हसन मुश्रीफांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही ईडीच्या या कारवाईर आपलं मत व्यक्त केलं आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच अजेंडा यामागे दिसून येतो आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. अशा पद्धतीने भारतात कारवाया केल्या जाणार असतील तर सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. सत्ताधाऱ्यांना कुणी विरोधच करायचा नाही ही मानसिकता असल्याची टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.

हसन मुश्रीफ अडचणीत-

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केडीसीसीविरोधात लेखी तक्रार केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा उपनिबंधकांना प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल १ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांना प्राप्त झाला. त्यानंतर हे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी डी. टी. छत्रीकर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था [लेखापरीक्षण] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार छत्रीकर यांनी बुधवारी संध्याकाळीच बॅंकेला भेट दिली. मात्र, ज्या मुद्द्यांबाबत लेखापरीक्षण करावयाचे आहे त्यातील बहुतांशी दस्तऐवज हा ‘ईडी’ने कुलूपबंद केला असल्याने प्राथमिक माहिती घेऊन ते परतले.

Web Title: NCP leader Supriya Sule has reacted to the action against Hasan Mushrif.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.