तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का?; राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रा वाघ यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:59 PM2022-07-22T18:59:41+5:302022-07-22T19:00:24+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

NCP leader Vidya Chavan has criticized BJP leader Chitra Wagh. | तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का?; राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रा वाघ यांना सवाल

तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का?; राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रा वाघ यांना सवाल

Next

मुंबई- भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ आणि फोटो ट्वीट केले होते. यानंतर नाना पटोले यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. राजकारणातील पातळी खालावत आहे. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांना कसं बदनाम करता येईल त्या बद्दलची प्रक्रिया सुरू आहे. आमचं लेगल सेल याबाबत कारवाई करेल. आम्हाला बदनाम केलं जात आहे. हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

चित्रा वाघ यांच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. स्त्री- पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील, तर याविषयी यांनी असं जाहीर पणे बोलणं चुकीचं आहे. तुमच्या पक्षात आले की सगळे पवित्र होतात आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करण्यासाठी पत्राकार परिषद घेऊन अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं आहे, असं विद्या चव्हाण यांनी सांगितलं.

तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे का?, असा सवालही विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच चित्रा वाघ यांनी भान राखावं, चित्रा वाघ यांना भान राहिलेलं नाही. भाजपाकडून काही तरी मिळावं यासाठी चित्रा वाघ बेचैन झाल्या आहेत, असा टोला देखील विद्या चव्हाण यांनी लगावला.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हायरल व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय नाना... तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं...." असं म्हणत चित्रा वाघ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस यांना ट्विट केलं आहे.

व्हायरल व्हिडिओत काय? 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती हॉटेलमध्ये एका महिलेच्या गळ्यात हात टाकून बसलेला आहे. हा व्हिडिओ पाठीमागून शूट करण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओत दिसणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा दिसू शकत नाहीये. पण व्हिडिओत नाना पटोले यांनी त्याच रंगाचा टी शर्ट परिधान केल्याचे फोटोजही दाखवण्यात आले असून तो त्यांचा व्हिडिओच असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: NCP leader Vidya Chavan has criticized BJP leader Chitra Wagh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.