'नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले...'; राज्यपाल राजीनाम्यावरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:55 AM2023-02-12T10:55:02+5:302023-02-12T10:56:30+5:30

वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

NCP MLA Jayant Patil criticized the BJP over Governor Bhagat Singh Koshyari's resignation | 'नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले...'; राज्यपाल राजीनाम्यावरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

'नवीन राज्यपाल भाजपच्या हातचे बाहुले...'; राज्यपाल राजीनाम्यावरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

Next

मुंबई - वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

'महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो'असं जयंत पाटील यांनी ट्विमध्ये म्हटले आहे. 

भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

'नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.   

'छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, असंही ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. 

२०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

दरम्यान, महाराष्ट्रासह एकूण १३ राज्यांमधील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी कैवल्य त्रिविक्रम परनाईक, सिक्कीमच्या राज्यपालपदी लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला, आसामच्या राज्यपालपदी गुलाब चंद कटारिया, आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी एस. अब्दुल नझीर, छत्तीसगडच्या राज्यपालपदी बिस्वा भूषण हरिचंदन, मणिपूरच्या राज्यपालपदी अनुसुईया उईके, नागालँडच्या राज्यपालपदी एल. गणेशन, मेघालयच्या राज्यपालपदी फागू चौहान, बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तर बी. डी. मिश्रा यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  

Web Title: NCP MLA Jayant Patil criticized the BJP over Governor Bhagat Singh Koshyari's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.