Join us

'म्हणून भाजप नेत्यांचा इगो दुखावला असेल'; जीआर मागे घेण्यामागचे रोहित पवारांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 3:08 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेला जीआर देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसातच पाठिमागे घेतला.

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यामुळे आता राज्याला २ उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान, आता काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसात बदलल्याचे समोर आले आहे, यामुळे फडणवीस यांनी पवार यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका सुरू केल्या आहेत, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही टीका केली. 

देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला

आमदार रोहित पवार म्हणाले, एखाद्या कारखान्याला  कर्ज काढण्यासाठी तिथे बोर्डाची जबाबदारी असावी, तिथे असणाऱ्या संचालकांवर जबाबदारी असावी असा जीआर अजित पवार यांनी काढला होता, पण त्यांना तो नको आहे, त्यांना काही द्यायच नाही. डायरेक्ट खिरापत हवी आहे, अजित पवार यांनी जीआर काढल्याने भाजप नेत्यांचा इगो दुखावला असेल,असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.

"भाजपला सरकारचा पैसा असाच वाटयचा आहे, कारखाना अडचणीत या लोकांनीच आणला आहे. आता त्यांनाच असा पैसाच घ्यायचा आहे. यावर जाचक अटी म्हणून अजितदादांनी जीआर काढला तो जीआर आठच दिवसात परत घेतला, याचा अर्थ या सरकारमध्ये काहीच अलबेल नाही असं दिसत आहे, असंही आमदार रोहित पवार म्हणाले.

'भाजप आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी आपल्या आमदारांच्या कारखान्यांना असा पैसा देत आहे. आपल्या नेत्यांच्या कारखान्यांना सोडून बाकी कोणत्याही कारखान्याला भाजप मदत देत नाही, असा आरोप आमदार पवार यांनी केला.   

टॅग्स :रोहित पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस