'आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, चिंता वाटते...'; गीता जैन यांच्या व्हिडिओवरुन रोहित पवारांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:02 PM2023-06-21T15:02:44+5:302023-06-21T15:03:17+5:30
सदर व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत गीता जैन यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: शहरातील मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी चक्क कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित अभियंत्याने कुटुंब राहत असलेल्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी पथक पाठवले होते, त्या पथकात ते अभियंताही सहभागी होती. त्यामुळे, संतापलेल्या आमदार गीता जैन यांनी अभियंत्याची कानउघडणी करत कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सदर व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत गीता जैन यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत आणि त्यासाठी अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. पण सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी कायदा बनवणाऱ्यानेच तो हातात घेणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही. राज्यात कुणी पिस्तूल हाती घेतंय, कुणी अधिकाऱ्यांना मारहाण करतंय तर कुणी धमकावतंय... हे पाहताना आपला महाराष्ट्र कुठं चाललाय, याची चिंता वाटते, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
लोकांचे प्रश्न सुटलेच पाहिजेत आणि त्यासाठी अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. पण सनदशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याऐवजी कायदा बनवणाऱ्यानेच तो हातात घेणं हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही. राज्यात कुणी पिस्तूल हाती घेतंय, कुणी अधिकाऱ्यांना मारहाण करतंय तर कुणी धमकावतंय... हे… pic.twitter.com/eUiTRLFX08
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 21, 2023
दरम्यान, आमदार गीता जैन यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील यांची कॉलर धरून कानशीलात लगावली. येथील परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या राहत्या घरावर तोडक कारवाईसाठी या अभियंत्यांच्या नेतृत्त्वात पथक गेले होते. त्यामुळे, पीडित कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी, आमदार जैन यांनी अभियंत्यास सरकारी नियम आणि माणुसकी शिकवत चांगलाच धडा शिकवला. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. यावेळी, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली. तसेच पावसाळ्यात राहती अनधिकृत घरे तोडू नयेत असे आहेत शासन आदेश आहेत, असेही त्यांनी सांगितले.