स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला

By कुणाल गवाणकर | Published: November 1, 2020 01:47 PM2020-11-01T13:47:29+5:302020-11-01T13:48:09+5:30

मुंबई लोकल सुरू करण्यास होत असलेल्या विलंबावरून रेल्वेमंत्र्यांवर टीका; राज्यातील भाजप नेत्यांवरही निशाणा

ncp mla rohit pawar slams railway minister piyush goel and state bjp over mumbai local | स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला

स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला

Next

मुंबई: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्यानं लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र याबद्दल राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा निर्णय झालेला नाही. रेल्वे प्रशासन लोकल सेवा सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करताना राज्यातल्या भाजप नेत्यांचाही समाचार घेतला आहे.

'श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,' अशा शब्दांत रोहित पवारांनी केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.



देशात लॉकडाऊन असताना अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं श्रमिक रेल्वे सोडल्या. त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकारमध्ये घमासान पाहायला मिळालं. रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप राज्य सरकारनं केला होता. तर राज्य सरकार मजुरांचा तपशील देत नसल्याचा दावा करत रेल्वेमंत्री गोयल यांनी पलटवार केला होता. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत गोयल ट्विटरवरून राज्य सरकारवर टीका करत होते. तोच संदर्भ देत रोहित पवारांनी गोयल आणि राज्य भाजपला लक्ष्य केलं आहे.

Web Title: ncp mla rohit pawar slams railway minister piyush goel and state bjp over mumbai local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.