Join us

'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 5:41 PM

रोहित पवार यांनी ट्विटरवरुन अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांची अधिकृतपणे पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

रोहित पवार यांनी ट्विटरवरुन अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील."

दरम्यान, मनसेच्या या राज्यव्यापी अधिवेशनसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या अधिवेनात अमित ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिले. त्यामुळे अमित ठाकरे आता सक्रीय राजकारणात उतरणार असल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

याशिवाय, या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मनसे महाअधिवेशन : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

 

टॅग्स :रोहित पवारअमित ठाकरेमनसेराष्ट्रवादी काँग्रेस