मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या असलेल्या विद्या चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेनं 16 जानेवारीला तक्रार दिली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि इतर सदस्यांविरोधात कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 1:49 AM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्दे राज्यातील विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित(पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण(आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे.विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.राष्ट्रवादीच्या महिला नेत्या असलेल्या विद्या चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.