Join us

अनिल देशमुख-परमबीर सिंग कुठे आहेत? राष्ट्रवादीने सांगितला नेमका पत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 12:53 PM

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनेकदा समन्स बजावूनही ईडीसमोर उपस्थित राहण्यास अनिल देशमुख तयार नाहीत. तसेच दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगही गायब असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ईडीने अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे. तर, अनिल देशमुख कुठे आहेत, याबाबत राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (ncp nawab malik criticised bjp over anil deshmukh ed case)

LIC चे फर्मान! IPO बद्दल कर्मचारी-एजंटना काहीही न बोलण्याची दिली सक्त ताकीद

अनिल देशमुख, परमबीर सिंग कुठे गायब आहेत हे राष्ट्रवादीने जाहीर करावे, असे आवाहन भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले होते. अनिल देशमुख यांच्यासह परमबीर सिंगही गायब आहेत, असे सांगत गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 

मोदी सरकारच्या कारकीर्दीत बेरोजगारी प्रचंड वाढली; राहुल गांधींची टीका

त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत

याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ते त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, राज्यात आहेत, देशात आहेत. पण तरीही ते फरारी आहेत का? हद्दपार आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यांच्या पक्षाने नेते हद्दपार आहेत, ज्यांच्या पक्षाचे लोक फरारी आहेत त्यांनी याप्रकरणी प्रश्न विचारू नयेत, असा पलटवार मलिक यांनी यावेळी केला. 

मोदी सरकारचा मेगा प्लॅन! देशवासीयांना मिळणार आणखी एक युनिक कार्ड; पाहा, डिटेल्स

या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत

स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

केवळ Ford नाही; गेल्या ५ वर्षात ‘या’ बड्या ऑटो कंपन्यांनी गुंडाळला गाशा; भारतात ठरल्या फेल!

दरम्यान, शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावूनही ते गैरजर राहिले आहेत. तसेच त्यांचा ठावठिकाणाही लागत नाहीय. यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे. अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये, यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे.  

टॅग्स :राजकारणअनिल देशमुखपरम बीर सिंगभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसप्रवीण दरेकरनवाब मलिकअंमलबजावणी संचालनालयगुन्हा अन्वेषण विभाग