मुंबई- पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीला एक जागा तर भाजपला एक जागा मिळाली. या निकालानंतर वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला होता. यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले.
'चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या उमेदवारीसाठी प्रकाश आंबेडकर हे आग्रही होते. पण, अजित पवारांनी नाना काटेंना उमेदवारी देऊ केली. राष्ट्रवादीनेच राहुल कलाटेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राहुल कलाटेला तुम्ही घ्या अन् निवडणूक लढवा ही भूमिकाही आम्ही घेतली होती. पण, हेकेखोरपणा तिथं असताना चालत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांना टोला लगावला होता. यावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
नोटांच्या ढीगाऱ्याचं गुढ आलं समोर! स्मार्ट वॉचने भाजप आमदार पुत्राला तुरुंगात पाठवले
आज कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्यत्तर दिले. पवार म्हणाले की, 'जे महाविकास आघाडीचे सदस्य आहेत त्यांच्यात एक वाक्यता आहे' जे महाविकास आघाडीचे सदस्य नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. असं प्रत्युत्तर पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर दिले.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, जनतेला आता बदलं हवाय, धनशक्तीला लोक जुमानत नाहीत. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपने टिळक आणि बापटांना डावलून निर्णय घेतला.
रविंद्र धंगेकर हे जनतेतील नेतृत्व आहेत, धंगेकर यांना यश मिळेल हे सामान्य लोक सांगत होते. कसबा हा भाजपचा गड आहे असं सांगितलं जायचं. धंगेकर हे सामान्य लोकांच्यात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. हा उमेदवार कधी चार चाकीमध्ये बसत नाही, दोन चाकीवर कायम असतो, त्यामुळे मतदारांचे लक्ष त्यांच्यावर आहे असं अनेकजण म्हणायचेत. हे आता खर झाले आहे, असंही शरद पवार म्हणाले.