Join us

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 12:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यात 'शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, त्यांना २ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळेल. व ३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे पक्षाच्या होणाऱ्या पक्षाच्या शिबीरास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, असं या पत्रात म्हटले आहे. पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करु नये, असंही आवाहन या पत्रात केले आहे.  (latest Marathi News)

१ नोव्हेंबरचा  नियोजित वर्धा दौरा

राज्यातील सामूहिक वन हक्कप्राप्त ७०० ग्रामसभा प्रतिनिधींशी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार हे १ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार होते, त्यांचा हा नियोजित दौरा आता रद्द होणार आहे. वर्धा येथील गांधी आश्रम सेवाग्राम येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही परिषद नियोजित होती.

विदर्भ उपजीविका मंचमधील सहभागी असलेल्या विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, नागपूर, खोज संस्था मेळघाट अमरावती, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळ, ग्राम आरोग्य संस्था, घाटी, जि. गडचिरोली, रिवाईडर्स चंद्रपूर, इश्यू नागपूर, संदेश गडचिरोली आणि विदर्भ सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ आदींच्या वतीने या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे श्रीकांत लोडम यांनी सांगितले होते. 

ncp

टॅग्स :शरद पवारमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसहॉस्पिटल