इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:49+5:302021-03-08T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दादर स्थानकाबाहेर स्वामी नारायण मंदिराजवळ निदर्शने केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दादर स्थानकाबाहेर स्वामी नारायण मंदिराजवळ निदर्शने केली. ‘मोदीजींची खरी बात, गरिबांच्या पोटावर लाथ’, ‘नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी मनमानी नही चलेगी’, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातील फलक फडकावले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि पक्षाच्या मुंबई विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली असून, घरगुती सिलिंडरचे दरही सातत्याने वाढत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे महागाई वाढली असून, गरिबांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप मातेले यांनी केला. या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून भाजपला शेणाच्या गोवऱ्या भेट देणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळापासून दादर येथील भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखत त्यांना ताब्यात घेतले.