“महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:20 PM2022-04-27T22:20:03+5:302022-04-27T22:21:09+5:30

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार असले, तरी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे शरद पवार म्हणाले.

ncp sharad pawar criticised central govt over religious violence in delhi and maharashtra | “महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार

“महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा”: शरद पवार

Next

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील जातीय हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील हिंसेवर चिंता व्यक्त करत महाराष्ट्रातही दिल्लीप्रमाणे वातावरण बिघडवण्याचे आणि समाजाला भडकवण्याचे काम सुरु आहे. सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न एकत्र येऊन हाणून पाडायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

मुंबईतील राष्ट्रवादीतर्फे आयोजित इफ्तार पार्टीत सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कोरोनाची परिस्थिती होती म्हणून आपल्याला मागच्या वर्षांत इफ्तार पार्टी साजरी करता आली नाही. मागच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

समाजात भांडणे लावणे योग्य नाही

आताच्या घडीला देशात खासकरून राज्यात आणि दिल्लीत एक प्रकारचा माहोल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत जे झाले ते चांगले झाले नाही. दिल्लीत हल्ले झाले, घरे देखील पाडण्यात आली. अशीच परिस्थिती आपल्या राज्यांत तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकांच्यात, समाजात भांडणे लावणे हे योग्य नाही. पोलिसांच्या विरोधात आरोप केले जातात. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजधानी दिल्लीत एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार आहे. पण दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातही कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी मिळून तो प्रयत्न हाणून पाडावा लागेल. असे शरद पवार म्हणाले. 
 

Web Title: ncp sharad pawar criticised central govt over religious violence in delhi and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.