Join us

पक्षनाव आणि चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:35 AM

निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे असणार असा निकाल दिला.

NCP ( Marathi News ) : निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे असणार असा निकाल दिला. या निर्णयाविरोधात आता राष्ट्रवादीतील शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीतील चिन्हाचा आणि नावाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे. 

घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षाचं नाव निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले आहे. हा निर्णय देऊन एक आठवडा झाला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल केले असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून आज सुप्रीम याचिका दाखल केली आहे. 

राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण

राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये  मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यानंतर दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची मागणी केली. पक्ष आणि चिन्हावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती, आठ दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने निर्णय देत पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिले. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आले आहे. 

पक्ष नाव आणि चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने चुकीचा दिला असल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे. या निर्णयाविरोधात पुरावे म्हणून ८०० पानांची कागदपत्र शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दिल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :शरद पवारसर्वोच्च न्यायालयअजित पवार