Join us

'बारामती... नको नकोss साहेब मला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 5:57 PM

चंदकांत पाटील यांनी देखील आम्ही बारामती जिंकून दाखवू असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निशाणा साधला आहे. 

मुंबई: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेकवेळा चंद्रकांत पाटील यांना थेट जनतेतून निवडून दाखवावे असं आव्हान देण्यात आले होते. त्याचप्रमाणे चंदकांत पाटील यांनी देखील आम्ही बारामती जिंकून दाखवू असं वक्तव्य केलं होतं. त्यातच आता चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभेचे एबी फॅार्म वाटप करताना दाखविण्यात आले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांना बारामती मतदार संघ हवा आहे का? अशी विचारणा केल्यानंतर चंद्रकांत पाटील नको नको साहेब मी तो विचार केव्हाच डोक्यातून काढून टाकला असून मला आता एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधा असं लिहून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कोथरुड मतदारसंघामध्ये भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार आहेत. कोथरुड मतदारसंघामधून पाटील यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता निर्माण होताच अखिल भारतील ब्राह्मण महासंघाकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. प्रसंगी ब्राह्मण महासंघाने स्वतः चा उमेदवार उभा करण्याची देखील तयारी देखील दर्शवली आहे. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारभाजपादेवेंद्र फडणवीस