Join us

Maharashtra election 2019: उमेदवार बाहेरचा, गर्दी बाहेरुन जमवलेली मग मतदारही बाहेरुन आणणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 7:39 PM

कोथरुड विधानसभा 2019- चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करत शक्तीप्रदर्शन केले.

मुंबई: कोथरुड विधानसभेचे उमेदवार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून आज (गुरुवारी) अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात करत शक्तीप्रदर्शन केले. मात्र या रॅलीमध्ये बाहेरुन गर्दी जमवल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकांत पाटील यांच्यावर कार्टूनद्वारे ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. यामध्ये कोथरुड मतदार संघातून उमेदवारी मिळाव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरताना भव्य रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसने निशाणा साधत उमेदवार बाहेरचा रॅलीमध्ये बाहेरुन जमा केलेली गर्दी, मग मतदारही बाहेरुन आणणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्टूनमध्ये उपस्थित केला आहे.

शक्तीप्रदर्शनासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल

कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात झाली. तिथून शक्तीप्रदर्शन करत पाटील यांनी कर्वे भरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. त्यापूर्वी त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शिवाजी महाराजांचा पुतळा येथे जमून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलकोथरुडमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेस