''अरे.. छोट्या तू 124 जागांवर कम्फर्टेबल आहेस ना...?''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:35 PM2019-10-01T18:35:34+5:302019-10-01T18:47:13+5:30
शिवसेनेला 124 जागांवर समाधान मानावे लागल्याने शिवसेना युतीमधील छोटा भाऊ ठरला आहे.
मुंबई: भाजपा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 164 जागांवर लढणार असून युतीमधील मित्रपक्षांना 18 जागा भाजपा स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. तसेच शिवसेनेला 124 जागांवर समाधान मानावे लागल्याने शिवसेना युतीमधील छोटा भाऊ ठरला आहे. शिवसेना युतीमधील लहान भाऊ असल्याचे सिद्ध झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्टून काढत ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. या कार्टूनमध्ये मुख्यमंत्रीसोबत शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुक आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना अरे! छोट्या तू कम्फर्टेबल आहेस ना..? असा प्रश्न विचारताना दाखवून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना नेहमीच युतीमधील मोठा भाऊ आम्हीच असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत 50- 50 फॅार्म्युला असाणार असा दावा देखील शिवसेनेकडून करण्यात येत होता. मात्र आज भारतीय जनता पक्ष-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीतील प्रत्येक पक्ष नेमका किती जागा लढणार, हा फॉर्म्युला अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार, भाजप १६४ व शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढणार आहे. मित्रपक्षांना द्यावयाच्या १८ जागा भाजप स्वत:च्या कोट्यातून देणार असल्याचे समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
खुर्ची अडवा, मित्रपक्षाची जिरवा..@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@BJP4India@OfficeofUT@AUThackeray@ShivSena#Election2019#MaharashtraElections2019#MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/4t3PJ8IV37
— NCP (@NCPspeaks) October 1, 2019