Join us

“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 8:37 PM

NCP SP Group Jayant Patil News: लोकशाही वाचवण्यासाठी सर्व जनतेने मोठे पाऊल उचलले. लोकसभेपेक्षा अधिक आशीर्वाद जनता विधानसभा निवडणुकीत देईल, असा दावा करण्यात आला.

NCP SP Group Jayant Patil News: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला चितपट केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काय योजना असेल, याबाबत काही मते मांडली आहेत. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोलही केला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला महाराष्ट्रातील सर्वाधिक बळ मिळाल्याचे म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  आपल्या महाविकास आघाडीने लोकसभेत घवघवित यश मिळवले. त्यानंतर आपल्यासमोर पहिल्यांदाच एकत्रितपणे येत आहोत. महाराष्ट्राने बजावलेली भूमिका अतिशय महत्वाची ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला जे बल महाराष्ट्रातील जनतेने दिल आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा झाल्या याचा अंदाज आपल्याला आला आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

लोकशाही वाचवण्यासाठी सर्व जनतेने मोठे पाऊल उचलले

जनतेने इंडिया आघाडीला जे मतदान केले त्यात महाराष्ट्रातील जनतेचा मोठा वाटा आहे.  लोकशाही वाचवण्यासाठी सर्व जनतेने मोठे पाऊल उचलले आहे. धार्मिक ध्रुवीकरण कुठेही पसरलेले नाही. महविकास आघाडीला जनतेने पाठिंबा दिला. लवकरात लवकर विधानसभेच्या दृष्टीने निर्णय घेणार आहोत. ज्याप्रकारे लोकसभेची निवडणूक झाल्या. त्याच ताकतीने विधानसभेच्या निवडणुका लढणार आहे.  आम्हाला खात्री आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद मिळाला, त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद मिळेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दरम्यान, जनतेला सत्य काय आहे हे कळत गेले. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. हा विजय अंतिम नाही ही लढाई सुरू झाली आहे. यानंतर विधानसभा आणि अनेक निवडणूका येतील. एनडीए हे सरकार किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न आहे. देशाची जनता निवडणुकीच्या वेळी जागी झाली असे आम्ही मानतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी