“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 03:17 PM2021-09-02T15:17:53+5:302021-09-02T15:19:51+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवर टीका आहे.

ncp supriya sule criticised cbi action over anil deshmukh | “केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

“केवळ महिला घरात असताना CBI ने कारवाई करणे चुकीचे”; सुप्रिया सुळेंची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जातेयसरे काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोयसुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या सीबीआय (CBI) चौकशी प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अनिल देशमुख यांचा जावई गौरव चतुर्वेदी यांना रात्री सीबीआयने ताब्यात घेतले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीबीआयवर टीका करत, केवळ महिला घरात होत्या, असे असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली. हे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या. (ncp supriya sule criticised cbi action over anil deshmukh)

“यात काडीमात्र तथ्य नाही, हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”; भुजबळांचे प्रत्युत्तर

अनिल देशमुख कुटुंबियांकडून जावई गौरव चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयच्या या कारवाईवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दबावतंत्र वापरून राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती

केवळ महिला घरात होत्या, असे असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयावर घरात जाऊन कारवाई करण्यात आली. हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणात, देशाच्या राजकारणात अशा प्रकाराला कधीच जागा नव्हती. महाविकास आघाडीचे काम आणि जनसामान्यांमध्ये महाविकास आघाडीबद्दल जे प्रेम आहे, ते गेल्या दीड वर्षात चांगल्या रितीने चाललेले आहे. राज्य सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. दुसरे काही विषय नसल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जातोय, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सीबीआय कारवाईवरून टीकास्त्र सोडले आहे. 

“आता जितेंद्र आव्हाड यांचा नंबर; लिस्टमधील १२वा खेळाडू!”; किरीट सोमय्यांचा दावा

दडपशाहीचे काम मी पाहिलेले नाही

या आधी अशा प्रकारचे दडपशाहीचे काम मी पाहिलेले नाही, असा यंत्रणेचा वापर मी केव्हाही पाहिलेला नाही. ईडी, सीबीआय हे सरकारी नियंत्रणात आहेत, त्यांच्या संघटनेतील माहिती लीक कशी होते ती कशी केली जाते? सुडाचे राजकारण कधी ऐकलेले नाही, महाराष्ट्रात हे राजकारण टिकणारे नाही, केंद्र सरकारची वागणूक अतिशय दुर्दैवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या टीव्ही९शी बोलत होत्या.

“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

दरम्यान, अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली वकील आनंद डागा यांना अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी वकील आनंद डागा यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला नेण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्याविरुद्धचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. तर वकील आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: ncp supriya sule criticised cbi action over anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.