Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:44 AM2021-03-31T10:44:26+5:302021-03-31T10:45:57+5:30

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार मानलेत.

NCP Supriya Sule tweeted a photo of Sharad Pawar in Hospital | Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट

Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट

googlenewsNext
ठळक मुद्देही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं कामशरद पवार यांच्या पित्त मालिकेतला खडा आज पहाटे बाजूला केला आहे, मात्र पित्ताशयावर सूज आहे.शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई – पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून ते त्यांचं रोजचं आवडतं काम करत असल्याची माहिती त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.(Saheb is doing what he loves the most reading his Morning Newspapers! Supriya Sule tweet Sharad Pawar Hospital Photo)  

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून म्हटलंय की, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत असं सांगत त्यांनी शरद पवारांचा रुग्णालयात पेपर वाचत असतानाचा फोटो अपलोड केला आहे.

शरद पवार यांच्या पित्त मालिकेतला खडा आज पहाटे बाजूला केला आहे, मात्र पित्ताशयावर सूज आहे. विविध तपासण्या चालू आहेत. पित्ताशयावरील सूज कमी झाल्यानंतरच त्यांचे ऑपरेशन होणार आहे अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर पवारांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पवारांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र अचानक त्रास सुरू झाल्यानं शरद पवार मंगळवारीच रुग्णालयात दाखल झाले होते.

एण्डोस्कोपी काय असते?

एण्डोस्कोपी पोटात लहानसे छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड (CO2) या वायूने रुग्णांचे पोट फुगवले जाते. त्यानंतर पोटाच्या आतील भागाचे निरिक्षण केले जाते. समस्या नेमकी काय आहे ते कळल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास नाभी व्यतिरिक्त दोन-तीन ठिकाणी छ‌िद्र तयार करून उपकरणं पोटात सोडली जातात आणि शस्त्रक्रिया केली जाते.

पश्चिम बंगाल दौरा रद्द

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पवार बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. तो कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. केरळमध्येही पवार प्रचार दौरे करणार होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व निवडणूक प्रचार दौरे आणि नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पवार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा दिल्या.

दिग्गजांकडून विचारपूस

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फोनवर विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितले होते. भारतरत्न लता मंगेशकर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. या सदिच्छांबद्दल त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे पवार यांनी म्हटले. लवकर बरे व्हावे अशी भावना व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पवार यांनी आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारमन यांनी विचारपूस केल्याचेही पवार यांनी ट्विट करून सांगितले.

Web Title: NCP Supriya Sule tweeted a photo of Sharad Pawar in Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.