राष्ट्रवादी सोडणार ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा

By दीपक भातुसे | Published: June 2, 2023 07:23 AM2023-06-02T07:23:19+5:302023-06-02T07:24:32+5:30

ठाकरे गटाला दोन्ही जागा सोडण्याची तयारी

NCP to drop claim on Thane Kalyan Lok Sabha constituencies Shiv Sena uddhav thackeray group ready to leave both the seats | राष्ट्रवादी सोडणार ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा

राष्ट्रवादी सोडणार ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा

googlenewsNext

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढताना मागील वेळी लढलेल्या काही जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवली आहे. त्यानुसार भाजपला पराभूत करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन्ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे, तर कल्याणमधून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीकडूून आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली होती, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच बाबाजी पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाची असलेली ताकद लक्षात घेता या दोन्ही जागा महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे जाव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे समजते. त्यामुळे या जागांवरील दावा सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने ठेवल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविलेल्या जागांवर जर ठाकरे गटाचा खासदार निवडून आलेला असेल, तर ती जागा सोडण्याची तयारी ठेवावी लागेल, असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी घेतलेल्या बैठकीतही स्पष्ट केले होते.

Web Title: NCP to drop claim on Thane Kalyan Lok Sabha constituencies Shiv Sena uddhav thackeray group ready to leave both the seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.