'तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे', राष्ट्रवादीनं राज ठाकरेंना डिवचलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:06 PM2022-05-20T15:06:41+5:302022-05-20T15:07:06+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी नियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती आज दिली.
मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी नियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती आज दिली. याच निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका करत राज ठाकरे यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं असून यात राज ठाकरेंनी जे पोस्टर ट्विट करत अयोध्या दौरा तूर्तास रद्द करत असल्याचं म्हटलं होतं. तेच पोस्टर राष्ट्रवादीनं ट्विट केलंय पण त्यासाठी लिहिलेलं कॅप्शन आता चर्चेचा विषय ठरत आहे.
“संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला”; बाळा नांदगावकरांचा खोचक टोला
तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे.
— NCP (@NCPspeaks) May 20, 2022
सविस्तर बोलूच...@mnsadhikrut#Ayodhya#अयोध्याpic.twitter.com/2I3iI7Kge0
"तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरुन लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच", असं ट्विट राष्ट्रवादीनं केलं आहे. ट्विटमध्ये राष्ट्रवादीनं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील मेन्शन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ट्विटवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन', मनसेच्या संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!
#अयोध्या#Ayodhyapic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
राज ठाकरे यांनी आज ५ जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली. तसंच रविवारी २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबतचं कारण सांगणार असल्याचंही राज यांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे अयोध्या दौरा पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे. दीड वर्षापूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. पण पुन्हा एकदा पायाच्या दुखण्यानं डोकं वर काढल्यामुळे राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे.
'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!
राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. भाजपाने राज ठाकरेंसोबत असं का केलं? असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला. कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असंही राऊत म्हणाले.