उत्तन डम्पिंग समस्ये विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार- खासदार फौजिया खान

By धीरज परब | Published: March 12, 2023 11:13 PM2023-03-12T23:13:21+5:302023-03-12T23:13:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- भाईंदरच्या उत्तन येथील महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करून लोकांच्या समस्यां प्रकरणी संसद भवन व राज्याच्या विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस ...

NCP will raise its voice against Uttan dumping issue- MP Fauzia Khan | उत्तन डम्पिंग समस्ये विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार- खासदार फौजिया खान

उत्तन डम्पिंग समस्ये विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार- खासदार फौजिया खान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- भाईंदरच्या उत्तन येथील महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडची पाहणी करून लोकांच्या समस्यां प्रकरणी संसद भवन व राज्याच्या विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज उचलेल असा इशारा खासदार फौजिया खान यांनी दिला आहे . उत्तन नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी फ्रिडा मोरायस यांच्या जनसंर्पक कार्यालयाच्या उदघाट्न साठी त्या शनिवारी आल्या होत्या . त्यावेळी फ्रिडा सह परिसरातील ग्रामस्थांनी पालिकेच्या डम्पिंग मुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढाच वाचला . 

पालिकेने प्रक्रिया न करता बेकायदा कचऱ्याचा डोंगर उभा केला असून त्याला सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडून धुराचे साम्राज्य पसरत असते . शिवाय कचऱ्याची दुर्गंधी कायमची असल्याने परिसरातील नागरिकांना जगणे असह्य होऊन आजारांना सामोरे जावे लागत आहे . कचऱ्यातून निघणाऱ्या घातक लिचेट मुळे डोंगराखाली शेती नष्ट झाली असून पाणी प्रदूषित झाले आहे . तेच प्रदूषित पाणी समुद्रात जाऊन जलप्रदूषण होत असल्याचे मुद्दे फ्रिडा यांनी खासदार फौजिया यांच्या समोर मांडले . परिसरातील डम्पिंगची समस्या ऐकून खासदार यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली . त्यावेळी डोंगरी चर्च चे फादर ऑस्कर फर्नांडिस , फ्रिडा सोबत होते . या प्रकरणी संसदेत व महाराष्ट्र विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवाज उठवेल असे त्यांनी सांगितले .

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी खा . फौजिया यांच्याशी संपर्क साधून साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासह शहरात लहान कचरा प्रकल्प सुरु झाले असून आणखी प्रकल्प सुरु होणार असल्याची माहिती दिली . तसेच ३० जून पर्यंत उत्तन डम्पिंग मध्ये साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे आश्वस्त केल्याचे फ्रिडा यांनी सांगितले . 

 

Web Title: NCP will raise its voice against Uttan dumping issue- MP Fauzia Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.